क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
झेंडुच्या फुलांचा भाव वाढला!
सर्वसाधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. मात्र यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर मंदीचे सावट असले तरी पुरवठाच खुंटल्याने भाववाढ होत आहे. दरम्यान पुजेसाठी लागणाऱ्या इतर फुलांची मागणी वाढली असून यांचे दरही वधारले आहेत. पावसामुळे मोगऱ्याची आवक घटली आहे. पूजेसाठी लागणारी चमेली, जास्वंद ही फुले, तसेच दुर्वा वसई, विरार परिसरातील शेतकरी लोकल रेल्वे गाडय़ांतून घेऊन येतात. जास्वंदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही मात्र अन्य फुलांची आवक लोकल सेवा बंद असल्याने कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर बाजारातील आवक काहीशा प्रमाणात सुरू झाली असून झेंडुच्या फुलांनी आपला भाव वाढवला आहे. गेल्या वर्षी १२० रुपये किलोपर्यंत स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून ३०० रुपये किलो इतका झाला. बाजारात सध्या मागणी मर्यादीत असली तरी टाळेबंदीच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या झेंडूच्या बागा आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराच्या फटक्यामुळे मुंबई बाजारात येणाऱ्या झेंडूची आवकच ७० टक्कय़ांनी घटली आहे. मुंबई आणि महानगर परिसरात झेंडूची आवक प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातून, तसेच सासवड-पुरंदर आणि जुन्नर या परिसरातून होते. त्यासाठीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैच्या दरम्यान केली जाते. परंतु टाळेबंदीच्या काळात आणि शिथिलिकरणाच्या धरसोड भूमिकेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड केली नाही. त्यात सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातील नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या लागवडीला महापूराचा फटका बसला. ‘दरवर्षी सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातून सुमारे २० टन झेंडूची दिवसाला वाहतूक होते. दरम्यान सध्या ग्राहकांचे प्रमाण मर्यादीत असले तरी शुक्रवारी मागणी वाढू शकते, तसेच याचवेळी राज्यातील इतर ठिकाणचा तसेच कर्नाटकातील काही झेंडू बाजारात उतरला तर दर कमी होऊ शकतात. मात्र तोपर्यंत झेंडूचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदर्भ - २१ ऑगस्ट २०२० कृषी जागरण,
संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
8
संबंधित लेख