क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळ पिकात फळगळ होण्याची कारणे!
फळपिकांमध्ये विविध कारणांमुळे फळगळ आढळून येते. यातील काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. भारी काळ्या जमिनीत सतत पावसामुळे जास्त काळ ओलावा राहिल्याने जमिनीत हवा खेळती राहत नाही. यामुळे झाडाच्या मुळांद्वारे होणारी अन्नद्रव्ये वहन क्रिया मंदावते. यामुळे झाडाची पाने पिवळी पडणे, पानगळ, फुलगळ आणि फळगळ यांसारख्या समस्या येतात. तसेच मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेंड्याकडून झाड वळण्याची समस्या येते. 2. ढगाळ वातावरणात अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे अन्नद्रव्ये निर्मिती क्रिया कमी होऊन देखील फळांची गळ होते. 3. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे गरजचे असते. जी फळे बहाराच्या सुरुवातीलाच पानविरहित फांद्यांवर पोसली जातात, त्यांची वाढ मंद गतीने होऊन, ती कमकुवत राहतात. जी फळे नवतीसोबत फुलांपासून तयार होतात त्यांची वाढ चांगली होते. 4. वातावरणातील तापमान जास्त असल्यास आणि पाण्याचा ताण पडणे हे देखील घटक फळगळ होण्यास कारणीभूत आहेत किंवा दिवस रात्रीच्या तापमानात जास्त तफावत झाल्यास देखील फळगळ होते. 5. असंतुलित अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा - झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. बहार धरल्यापासून बागेस मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अशी सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये यांचे संतुलित नियोजन करणे आवश्यक आहे तसेच जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. 6. फळमाशीचा प्रादुर्भाव - फळ माशी फळाला डंक करून आतील रसशोषण करते. त्यामुळे फळ खराब होऊन गळ होते. यावर उपाययोजना म्हणून बागेत फुले लागताच फळमाशीच्या सापळे लावावे. तसेच फळ सेटिंग झाल्यावर फळांना प्लास्टिक बॅग लावावे. तसेच किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कीटकनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. 7. बुरशीचा प्रादुर्भाव होणे - फळांच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळ देठाजवून कमकुवत होऊन फळांची गळ होते. अश्या विविध कारणामुळे फळपिकात मोठ्यात प्रमाणात फळगळ होऊन आर्थिक नुकसान होते, यासाठी वरील सगळ्या बाबी लक्षात घेऊन बागेचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
28
संबंधित लेख