क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल भाग - २
आम्ल प्रक्रिया लॅटरल व ड्रीप मध्ये साचलेले क्षार जसे कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम कार्बोनेट, किंवा फेरीक आक्साइड ठिबक सिंचन संचाचे कार्य मंदावतात अथवा बंद पाडतात. हे जमा झालेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करतात. त्यासाठी सल्फुरिक आम्ल (६५%), हायड्रोक्लोरिक आम्ल (३६%), नायट्रिक आम्ल (६०%) किंवा फॉस्फेरिक आम्ल (८५%) यापैकी कुठलेही उपलब्ध होणारे आम्ल वापरू शकतो. आम्ल द्रावण तयार करण्याची पध्दती : • एका प्लॅस्टिक च्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात आम्ल (अॅसिड) मिसळत जावे. • आम्ल मिसळताना मधेमधे पाण्याचा सामू पीएच मीटरने अथवा लिटमस पेपरने मोजावा. • पाण्याचा सामू ३ ते ४ होईपर्यंत (लिटमस पेपर चा रंग फिकट गुलाबी होईपर्यंत) पाण्यात आम्ल मिसळत जावे. • पाण्याचा सामू ३ ते ४ करण्यासाठी किती आम्ल लागले ते लिहून ठेवावे. • पंप चालू केल्यानंतर संचाच्या शेवटच्या ड्रीपर पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. साधारणत: १५ मिनिटे वेळ लागतो असे गृहीत धरू. • संचातून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन १५ मिनिटात त्या संचातून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्याचा हिशेब करून त्यासाठी लागणारे आम्लाचे प्रमाण काढावे. त्यासाठीचे सूत्र खालीलप्रमाणे: एकूण १५ मिनिटात संचातून सोडायचे आम्ल (लिटर) = १५ मिनिटात संचातून होणारा पाण्याचा विसर्ग (लिटर) X १ लिटर पाण्याचा सामू ३ ते ४ होण्यासाठी लागणारे आम्ल (लिटर) आम्ल प्रक्रिया करण्याची पध्दती: • आम्ल प्रक्रिया करण्यापूर्वी, अंशत: किंवा बंद पडलेले ड्रीपर्स (तोट्या) वर खूण करून ठेवावे. तसेच फिल्टर, मेन आणि सबमेन लाईन फ्लश करून घ्यावे. • ठिबक सिंचन संच सामान्य दाबाने चालू ठेवावा व वरील सूत्राप्रमाणे मिळवलेले आम्लाचे द्रावण तयार करून घ्यावे. • पाण्याचा संचामधून किती प्रवाह चालू आहे, ते तपासून पाहून त्यानुसार प्रवाह निश्चित करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
7
संबंधित लेख