क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील तपकिरी तुडतुडे किडीचे नियंत्रण!
मुसळधार पावसानंतर काहीं ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. अशा परिस्थितीत भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. साधारण जुलै ते डिसेंबर हा किडींचा प्रादुर्भाव कालावधी आहे. प्रादुर्भावाची लक्षणे:- प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते. प्रादुर्भाव शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही. नियंत्रण:- • रोपे शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. • तणांचे नियंत्रण करावे. • नत्र खतांचा वापर प्रमाणात करावा, अती वापर करू नये. पोट्याश जास्त वापरल्यास फायदा होतो. • रात्री प्रकाश सापळे लावावे. • कीडनाशकाचा वापर करण्याआधी पाण्याचा योग्य निचरा करावा. • प्रत्येक चुडात ५ ते १० तुडतुडे आढल्यास, इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @१४ ग्रॅम प्रति एकर किंवा फ्लोनिकॅमीड ५० टक्के @३ • ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० ईसी @२५ मिली किंवा कार्बोसल्फान २५ टक्के @१६ मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी .
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
49
28
संबंधित लेख