कृषी वार्ताकृषी जागरण
पुरवठा घटल्याने घाऊक कांदयाचे दर दुप्पट!
मागील तीन महिन्यांत कांदयाचे घाऊक दर जवळपास दुप्पट झाले आहेत. यामागील कारण आहे अतिवृष्टी. दक्षिण भारतात जास्त पाऊस पडल्याने कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित होत आहे. त्यामुळे होणारी टंचाई यामुळे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा देश आहे. कांद्याचे दोन पीक चक्र आहेत, पहिली काढणी नोव्हेंबर ते जानेवारीत सुरू होते आणि दुसरी काढणी जानेवारी ते मे या कालावधीत होते. दरम्यान, घाऊक बाजारपेठेत काही दिवसात कांदयाच्या भावात कमालीची वाढ दिसून येत आहे.भाव १६ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. काही बाजारांमध्ये किंमती आणखी जास्त असण्याचा अनुमान केला गेला आहे . महाराष्ट्रातील अहमदनगर येथील कांद्याचे व्यापारी नंदकुमार शिर्के म्हणाले, दक्षिण भारतात विशेषत: कर्नाटकात अति पावसामुळे स्थानिक पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच येथे कांदयाच्या भाव २० रुपये इतका आहे. दरम्यान, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) भाव स्थिरतेसाठी कांद्याची खरेदी केली आहे. सन २०२० मध्ये नाफेडने १०,००,००० टन कांदा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते, जे जवळपास पूर्ण झाले आहे. असे सांगण्यात आले. नाफेडच्या वतीने आम्ही जवळपास ३८००० टन कांदा खरेदी केली आहे, 'अशी माहिती महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाच्या (महाएफपीसीचे )एमडी योगेश यांनी दिली. नाफेडने नाशिक जिल्ह्यातून आणखी ४०, हजार टन कांद्याची थेट खरेदी केली आहे. मोठा ग्राहक समुह असलेल्या हॉटेल उद्योगाकडून या काळात कांद्याची मागणी कमी होत आहे. कारण संपूर्ण देशभर कोरोनाचे सावट पसरले आहे. यावर्षी जास्त आर्द्रतेमुळे कांदा सडण्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त आहे. यामुळे शेतकरी कांदा लवकर विकण्याच्या प्रयत्नात आहेत. संदर्भ - २५ ऑगस्ट२०२० कृषि जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
90
22
संबंधित लेख