क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तालोकमत
पावसाचा पिकांना फटका: पीक विमा योजनेकडून नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू!
काही जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. निसर्गराजा मराठवाड्यावर यंदा पहिल्या दिवसापासून मेहेरबान आहे. सर्वच जिल्ह्यांत वेळेवर पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातून पाणी येण्याआधीच जायकवाडीत समाधानकारक पाणीसाठा झाला. मात्र, या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. उस्मानाबाद आणि लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांत या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांच्या शेतातील पाणी अजुनही हटलेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पिके धोक्यात - गेल्या आठ ते दहा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, सोयगाव, कन्नड, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.जिल्ह्यातील कापूस, मका या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हिंगोलीत पूरस्थितीचा पिकांना पुन्हा फटका - जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकºयांना फटका बसला आहे. उस्मानाबादेत किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त - जिल्ह्यातील मोजकीच गावें वगळता अद्याप कोठेही मोठा पाऊस झालेला नाही़ आणि सध्या उडीद, मूग, सोयाबीन, मका यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे सध्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ यातील प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, मका व कापूस ही पिके रोगाच्या कचाट्यात अडकली आहेत़ बीडमध्ये पिकांना धोका - जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे सगळीच पिके जोमात आलेली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मागील ८ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे काही मंडळांत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. १० ऑगस्टपासून सुरु झालेल्या संतधार पावसामुळे उडीद व मूग पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवरील मुगाचे नुकसान - जिल्ह्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून,मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, परभणी, जिंतूर, पूर्णा, पालम इ. तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. याशिवाय अतिवृष्टीचा कापूस, सोयाबीन इ. पिकांनाही फटका बसला आहे. या सर्व नुकसानीठी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा करून घ्यावे .त्यासाठी राज्य सरकारने पीक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत (पीएमएफबीवाय) लाभ घेण्याची आणखी एक संधी दिली आहे. सरकारने सांगितले की ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकरी पीक विमा प्रीमियम सादर करू शकतात. संदर्भ- २२ ऑगस्ट २०२० लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
5
संबंधित लेख