अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियम कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना!
ब्लॉसम एंड रॉट' हा रोग नसून फळे विकासाच्या अवस्थेत फळांच्या पेशीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा शारीरिक विकार आहे. सामान्यतः जमिनीत पाण्याची कमी (कोरडी माती / कमी ओलावा) हे ब्लॉसम एंड रॉट होण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा कोरड्या मातीची स्थिती पिकातील पाण्याच्या हालचालींची मात्रा कमी करते तेव्हा फळांकडे कॅल्शियमचे वहन कमी होते. ब्लॉसम एंड रॉट मुख्यत्वे टोमॅटोवर आढळतो. हि विकृती टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या पद्धती वापरल्या पाहिजेत ज्यामुळे वनस्पतीद्वारे कॅल्शियम योग्य प्रमाणात शोषले जाऊ शकेल. पिकामध्ये हि विकृती आढळून आल्यास नियंत्रणासाठी चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी किंवा १० किलो कॅल्शियम नायट्रेट २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून करून ठिबकद्वारे द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
81
33
संबंधित लेख