क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील 'टिक्का' रोगाचे नियंत्रण!
हा रोग बुरशीपासून होतो. ह्या रोगामुळे पानावर ठिपके पडतात. म्हणून यास टिक्का रोग असे म्हणतात. सुरवातीला या रोगाची लक्षणे फक्त पानावरच आढळून येतात. पानावर दोन जातींच्या बुरशीमुळे वेगवेगळ्या आकाराचे ठिपके दिसून येतात. भुईमूगाची वाढ झाल्यानंतर पानावर गोलाकार किंवा वेळेवाकडे, तांबूस करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात व अशा ठिपक्यांची वाढ होऊन ते एकमेकात मिसळून जातात. या ठिपक्याभोवती सुरवातीस पिवळे वलय दिसून येते. अनुकूल हवामानात झाडाच्या जमिनीवरील सर्व मुळे पाने कमजोर होतात व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाने गळून पडतात. याचा फलधारणेवर व शेंगाच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. नियंत्रण:- कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @ ९० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल ५% ईसी @२०० ते ४०० मिली किंवा कार्बेन्डाझिम १२% + मॅंकोझेब ६३% डब्ल्यूपी @२०० ग्रॅम किंवा सल्फर ८०% @ १-२ किलो प्रति एकर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
36
9
संबंधित लेख