क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकातील पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण!
हवामानातील बदलांमुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पपई फळझाडावरील पिठ्या ढेकणाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट होते. ही कोड बहुभक्षी असल्याने अनेक महत्चाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पोचू शकते. त्यामुळे पिठ्या ढेकणाचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.  कीड कशी ओळखावी:- पिठ्या ढेकणाची मादी पिवळ्या रंगाची असून, शरीराच्या बाहेरील आवरणावर पांढरी पावडर असते. मादीला पंख नसतात. नर हे कोषावस्थेच्या आधी आणि कोषावस्थेत विशेषतः गुलाबी रंगाचे असतात.  नुकसान:- ही कोड झाडाच्या विविध भागांमधून स्स शोषण करून झाडाला दुर्बल बनवते. ज्यामुळे, झाडांची पाने चुगळतात, पिवळी पडून कोमेजून जातात. ही कीड़ आपल्या शरीरातून एक मधासारखा। द्रवपदार्थ सोडत असल्यामुळे काळ्या बुरशीची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे प्रादुर्भाव झाल्यास फळावर एक प्रकारच्या पांढ-या पावडरचा थर तयार झाल्यामुळे ते खाण्याजोगे राहत नाही.  नियंत्रण:- • प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने नष्ट करून जाळून टाकावीत. तण तसेच इतर वनस्पती नष्ट कराव्यात. • प्रादुर्भावग्रस्त फांद्या कलम व रोपांची लागवड करू नये. मुंग्यांची घरे (वारुळे) नष्ट करावीत. शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे स्वच्छ करावीत. • पिकाला पाटपाणी देण्याचे टाळावे • कृषी तज्ञांच्या शिफारशीनुसार रासायनिक औषधांची फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
10
संबंधित लेख