क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या कापूस पिकत 'पिठ्या ढेकूण' किडीचा प्रादुर्भाव आहे का?
या किडीच्या सर्व अवस्था कापसाच्या सर्व भागातून रस शोषून घेतात. परिणामी कापसाच्या ज्या झाडांवर प्रादुर्भाव झाला आहे अशी झाडे विखुरलेली, आकसलेली आणि गुच्छीदार पाने होत असून झाडाची वाढ खुंटलेली दिसते. ही कीड शरीराद्वारे चिकट पदार्थ बाहेर टाकते, त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. कापसाची प्रत खालावते. उत्पादनात बरीच घट येते.  नियंत्रण:- • प्रादुर्भावग्रस्त सर्व झाडे काढून नष्ट करावी. • पिकांमधील तण काढून पिकामध्ये न ठेवता किंवा पाण्यामध्ये न टाकता नष्ट करावीत. • शेतीमध्ये मुंग्यांचे वारूळ शोधून त्याच्या बिळामध्ये क्लोरपायरीफॉस २० ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. • किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क (१०,००० पीपीएम) @ ६०० मि.ली. किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी २% एएस @८०० मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. • जर प्रादुर्भाव वाढत आहे, असे दिसल्यास कृषी तज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
6
संबंधित लेख