सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल!
कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळ पिकात अवलंब केला जातो. सूक्ष्मसिंचन पद्धतीत ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे जरुरीचे आहे. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल: अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता:  ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामन्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरले जाते.  प्रथमत: संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहित करावे.  फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टर ची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.  रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवून सील व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.  फिल्टर च्या तळाशी असलेल्या हॉल्व्हचा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी. ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची (वाळूची गाळणी) स्वच्छता: ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते ते खालीलप्रमाणे:  सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग व्हॉल्व पूर्णपणे चालू करावा.  मुख्य कंट्रोल व्हॉल्व व आऊटलेट व्हॉल्व पूर्णपणे बंद करावा.  फ्लशिंग करते वेळी बायपास व्हॉल्व अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.  बॅक फ्लश व्हॉल्व मधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा. क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची स्वच्छता: या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला व्हॉल्व उघडून जमा झालेली वाळू काढून टाकावी. ड) डिस्क फिल्टरची स्वच्छता:  या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातून घन कण काढून टाकण्यासाठी होतो.  डिस्क फिल्टर उघडून सर्व चकत्या मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात.  मोठ्या बादलीत १०% तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास ते दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.  सर्व चकत्या पूर्वी होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टर ची जोडणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
6
संबंधित लेख