अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
टोमॅटो पिकातील ही कीड अतिशय उपद्रवी असते. टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील हि कीड शेंड्याची पाने खाते. नंतर टोमॅटो अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळांना बीळ पाडते. टोमॅटो फळात विष्टा टाकतात त्यामुळे टोमॅटो फळे खराब होतात सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकात लागण होते. या किडींमुळे टोमॅटो पिकाचे ३० टक्कयापर्यंत नुकसान होते. ही कीड वर्षभर आढळणारी आहे. त्यामुळे याचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी फ्लूबेंडामाईड २०% डब्ल्यूजी @ ४० ते १०० ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडझी @८० मिली किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल ८.८०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १७.५०% एससी @ ६० मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
39
22
संबंधित लेख