क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील खोड किडीचे नियंत्रण!
या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटीकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये आढळुन येतो. अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापुर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गाभा मर” असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळुन येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढ-या लोंब्या बाहेर पडतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते. • उपाय:- नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक यासाठी क्लोरअँट्रेनिलीप्रोल ०.४ जीआर @ १० किलो किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड ४ जी @ १० किलो किंवा क्लोरअँट्रेनिलीप्रोल ०.५% + थायोमेथॉक्झाम १% जीआर @६ किलो किंवा फिप्रोनिल ०.३ जीआर @२०-२५ किलो प्रति हेक्टर वापरावे. भात शेतात कीटकनाशक वापरल्यानंतर पाणी काढून टाकू नये.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
24
संबंधित लेख