क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील खोडमाशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे, जीवनक्रम व उपाय
• या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात. • मादी माशी देठावर व पानावर अंडी घालतात. • अंड्यातून बाहेर पडलेल्या पाय नसलेल्या अळ्या पाने पोखरतात आणि त्याद्वारे फांदीचा आतील भाग पोखरून खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत. • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुर्वातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्थ झाड वाळते व मोठ्या प्रमानात नुकसान होते. मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडांवर खोडमाशीचे अळीच्या प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. • खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात व खोडात असतो. अशा किडग्रस्थ झाडावरील फुलांची गळ होते. शेंगातील दाण्याचे वजन कमी होवून उत्पादनात १६ ते ३० टक्केपर्यंत घट होते.  व्यवस्थापन:- • या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फोरेट १० किलो प्रती हे पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून देणे आवश्यक असते. • पिकामध्ये प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरअँट्रेनिप्रोल १८.५ एससी @२ मि.लि. किंवा इथिऑन ५० टक्के ईसी @१५ मिलि किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% @२.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
68
11
संबंधित लेख