क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील खोड भुंगेरा किडीचे नियंत्रण!
डाळिंब पिकामध्ये झाडाचे निरीक्षण केल्यास खोडाच्या आतील भागांवर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळल्यास मुख्यत्वे शॉट होल बोअरर (खोड भुंगेरा) चा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे. प्रामुख्याने कमजोर झाडांवर व सिराटोसीस्टीस बुरशीची लागण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या द्रव्याकडे खोड भुंगेरे आकर्षित होतात. खोड भुंगेऱ्यांच्या नियंत्रणाकरिता गेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २० मि.लि. अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पेस्ट तयार करून दोन वर्षांहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून २ फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरीत्या लेप द्यावा. बहार धरतेवेळी पानगळ केल्यानंतर आणि फळतोडणी झाल्यानंतर त्वरीत वरील मिश्रणाचा लेप अवश्य द्यावा. खोड भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भाव हा कमजोर झाडावर होतो. म्हणून झाडे सशक्त करण्यासाठी झाडांना अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा नियमित करावा. खोड भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात. त्या बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट कराव्यात.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
30
6
संबंधित लेख