क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकामध्ये ‘झिंक’ सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्व व वापरण्याची योग्य पध्दत!
झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मका पिकाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण मका पिकाला झिंकची गरज इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांपेक्षा जास्त प्रमाणात असते. कणिसामध्ये दाणे भरण्यासाठी झिंक अत्यंत महत्वाचे अन्नद्रव्ये आहे. त्यामुळे झिंकची कमतरता असल्यास मका पिकाच्या उत्पादनात १० ते १५% ने घट होण्याची शक्यता असते त्यामुळे मका पिकात झिंकची मात्रा देणे अत्यंत महत्वाचे आहे. बरेच शेतकरी मका पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर प्रति एकर १० किलो या प्रमाणात करतात. परंतु शेतकरी या झिंक सल्फेटचा वापर इतर स्फुरदयुक्त रासायनिक खतासोबत मिक्स करून करत असतात. त्यामुळे या झिंक सल्फेट मधील झिंकचे स्फुरदयुक्त खतामधील स्फुरदाबरोबर मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते, त्यामुळे यातील झिंक पिकांना खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिंक सल्फेट चा वापर स्फुरदयुक्त खतासोबत टाळणे गरजेचे आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी मका लागवडीवेळी युरियामध्ये झिंक मिसळून खतमात्रा द्यावी. यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
8
संबंधित लेख