क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत प्रत्येक शेतकरी होणार ट्रॅक्टरचा मालक!
शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. नव-नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. आता मोदी सरकारने धमाकेदार योजना आणली असून यामुळे प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरचा मालक होणार आहे. हो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली असून या योजनेतेर्गंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. या योजनेच्या लाभ घेतल्याने शेतकऱ्यांच्य शेतातील कामे वेळेत पुर्ण होतील. या योजनेला पीएम ट्रॅक्टर योजनाही म्हटले जात असून ही योजना सर्व राज्यांमध्ये सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या योजनेच्या अतंर्गत २० ते ४० ट्क्क्यांपर्यंत अनुदान देखील मिळते. सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला एकही पैसा द्यावा लागत नाही. देशातील अनेक शेतकरी आर्थिक दुष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे शेतीला लागणारे अवजारे त्यांना घेता येत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेत सरकारने ही योजना सुरू केली आहे. o काय आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना :- छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टरचे मालक होऊ शकतील. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जाते. घऱातील एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. o पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची काय आहे पात्रता:- • शेतकरी कोणत्या प्रकारचा करदाता नसावा. • शेतकरी सरकारी नोकर नसावा. • देशातील विधवा महिला आणि विकल्यांग महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. • आर्थिक दुष्ट्या दुर्बल असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. o कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता:- • आधार कार्ड • ओळख प्रमाणपत्र • पासपोर्ट फोटो • मोबाईल नंबर • बँक पासबुक • जर दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाण पत्र • जर अर्जदार महिला विधवा असेल तर पतीचा मृत्यू दाखला जे शेतकरी या योजेनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत. ते तहसील कार्यालयाच्या जन सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकतात. यासाठी आपल्याला एक अर्ज भरावा लागेल. कृषी विभागाच्या पडताळणी नंतर बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्यानंतर ट्रॅक्टर कंपनी आपल्याला ट्रॅक्टर देते आणि अनुदानदेखील आपल्या बँक खात्यात जमा करत असते. संदर्भ:- कृषि जागरण, ८ ऑगस्ट २०२०., यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
778
142
संबंधित लेख