क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नारळ पिकातील फळगळ व त्यावर उपाययोजना!
नारळाची फळे बोराच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठी असताना गळून पडतात व यामुळे नारळ उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट होते. नारळाच्या झाडांचे योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास या समस्येतून मार्ग काढता येतो. नारळ फळगळीची प्रमुख कारणे - • वातावरणामध्ये झालेले अचानक बदल. • परागीकरण व्यवस्थित न होणे. • अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापनामधील चूका. • नारळाच्या फळांची गळ प्रामुख्याने उंदरांच्या प्रादुर्भावाने होते. उंदीर कोवळी फळे पोखरतात. • बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव. उपाययोजना • निरोगी नसणारी फळे तोडून ते शेताबाहेर जाळावित किंवा जमिनीमध्ये गाडावित. • पावसाळा सुरु होण्यापूर्वी व पावसाळ्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा ठिबकद्वारे सोडावे. • शिफारस केलेली खते वर्षातून दोन वेळा जून -जुलै व नोव्हे - डिसें मध्ये विभागून द्यावीत. • तसेच वर्षातून एकदा सुक्ष्म अन्नद्रव्य फेरस सल्फेट ,झींक सल्फेट , मॅग्नेशीयम सल्फेट , मॅगेंनिज सल्फेट, बोरॅक्स शेणखतासोबत द्यावीत. • वर्षातून दोन वेळा जीवाणू खते अझाटोबॅक्टर ,पी एस बी 2 किलो/ एकर किंवा 50 ग्रॅम /झाड प्रमाणे शेणखतासोबत द्यावे. • जमिनीच्या मगदूरानुसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होवून फळगळ वाढलेली दिसून येते. • जमिनीपासून 2 मीटर उंचीवर 40 सें. मी. रुंदीचा गुळगुळीत पत्रा बसवावा. • 1 भाग झिंक फॉस्फाईड व 50 भाग गव्हाचे पीठ यापासून तयार केलेल्या आमिशाच्या गोळ्या पानांच्या बेचक्‍यात एक महिन्याच्या अंतराने टाकाव्यात • विशेषतः कोळी या किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळ फळगळ होत असल्याने कडुनिंबातील अझाडिरेक्‍टीन या घटकावर आधारित कीटकनाशक 7.5 मिलि किंवा 10 हजार पीपीएम तीव्रतेचे 10 मिलि सम प्रमाणात पाण्यात मिसळून एप्रिल ते मे, ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत मुळाद्वारे वर्षातून तीन वेळा द्यावे किंवा कडुनिंब आधारित अझाडिरेक्‍टीन घटक (10 हजार पीपीएम) 4 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. • फळांवर पांढरे ठिपके दिसत असल्यास सल्फर पावडरची फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
7
संबंधित लेख