क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील सूत्रकृमींचे नियंत्रण!
 सूत्रकृमी ही अतिसूक्ष्म कीड असून, ती साध्या डोळ्यांनी दिसून येत नाही. सूत्रकृमीची मादी मुळांच्या अंतर्गत भागावर राहून मुळातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात. या गाठींमुळे अन्नरस वहनात बाधा तयार होते. दिलेली अन्नद्रव्ये झाडास उपलब्ध होत नाहीत त्यामुळे झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फूलधारणेचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे.  नियंत्रण:- • शेणखतासोबत पॅसिलोमायसीस लीलासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (एएन २७) १ किलो प्रति एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. • त्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोनवेळा ड्रेंचिंग करावी. • बागेतील दोन झाडांमधील अंतरामध्ये आफ्रिकन झेंडू ची लागवड करावी. • उत्तम परिणामाकरिता झेंडूंची वाढ ५ ते ६ महिन्यांपर्यंत होऊ द्यावी. तसेच हिरवळीची पिके घ्यावीत उदा. ताग, धैंचा ही सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरतात.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
12
संबंधित लेख