क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
या किडीची अंड्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात.पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते.अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम कीडग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. तसेच क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा थीअक्लोप्रिड २१.७ एससी @१० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @१० ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @१० मिली किंवा प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
91
44
संबंधित लेख