क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकातील डाऊनी (केवडा) रोगाचे नियंत्रण!
काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये सध्याचे वातावरण डाऊनी (केवडा) रोगप्रसारास अनुकूल आहे. 'डोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस' नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगामध्ये सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवट-पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ वातावरणात या ठिपक्यांच्या खालील बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी होतात. विशेषतः पूर्ण वाढ झालेल्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तीव्र प्रादुर्भावामध्ये पानाचे देठ, बाळ्या, फांद्यावरही आढळतो. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात. रोगग्रस्त वेलींना फुले-फळे कमी प्रमाणात व लहान आकाराची लागतात. त्यांचा दर्जा कमी आणि बेचव असतो. वेली लवकर सुकतात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. उपाय - • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. • पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी. • डायथेन झेड ७८ @२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
86
61
संबंधित लेख