क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील मर रोगाचे नियंत्रण!
तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत कधीही होतो. हा रोग जमिनीतील फ्युजेरियम उडम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे किंवा जमिनीतील तापमान व ओलावा यांमुळे हा रोग उद्भवतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची शेंड्याकडील पाने कोमजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. या रोगाचा शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते. म्हणून मर रोगाच्या प्रतिबंधासाठी, ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ किलो प्रति एकरी शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून द्यावे. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास (कमी प्रमाणात) रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. शेतात पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
99
30
संबंधित लेख