क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखICAR – IISR, Indore
सोयाबीन आठवडी पीक सल्ला - २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२०
 सोयाबीन पीक घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच भागामध्ये मागील २ ते ३ आठवड्यपासून पाऊस न पडल्याच्या बातम्या येत आहेत. अश्या वेळी आपल्या पिकांवर परिणाम होऊ शकतो. सर्व शेतकरी बंधूना सूचित करण्यात येत कि आपण उपलब्ध संरक्षित पाणी जमिनीला भेगा पडण्याच्या पूर्वी द्यावे.  सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याचा प्रसार सफेद माशीमुळे होतो आणि सफेद माशीच्या नियंत्रणासाठी आपण शेतामध्ये पिवळे चिकट सफाळे लावावेत. पिवळा मोझॅक व्हायरस चा प्रादुर्भाव दिसून आल्यास अशी प्रादुर्भाव ग्रस्त झाडे शेताबाहेर काढून नष्ट करावीत आणि सफेद माशी नियंत्रणासाठी थायोमेथोक्साम + लॅम्बडा सायलोथ्रीन @ ६० मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. याची पाने खाणाऱ्या आळी नियंत्रणास हि मदत होईल  तसेच सोयाबीन मध्ये नुकसान करणाऱ्या किडींच्या जसे कि खोडमाशी, पाने खाणारी आळी, सफेद माशी, गर्डल बीटल, हिरवी आळी आदींच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्साम + लॅम्बडा सायलोथ्रीन ६० मिली किंवा बीटासायफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रिड @ ८० मिली प्रति एकर २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.  काही भागामध्ये या पिकावर अँथ्रॅकनोज नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजले. याच्या नियंत्रणासाठी टेंबुकोनॅझोल @ २०० मिली किंवा टेंबुकोनॅझोल + सल्फर @ ४०० ग्रॅम किंवा पायराक्लोस्ट्रोबीन २० % डब्लूजी @१५० ग्रॅम प्रति एकर यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
संदर्भ:- ICAR – IISR, Indore. https://iisrindore.icar.gov.in/ ., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
20
संबंधित लेख