अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी!
शेतकरी बंधूंनो, तूर पीक साधारणतः ३५-४५ दिवसांचे असल्यास झाडांचे शेंडे मजुरांच्या साह्याने खुडून घ्यावे. या वेळी पाऊस सुरू असल्यास शेंडे खुडल्यामुळे झालेल्या जखमेतून बुरशीजन्य रोगाचा प्रसार होऊ शकतो. तो टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची एक फवारणी घ्यावी. फांद्या धरण्याच्या अवस्थेत मुख्य शेंडा खुडून घेतल्यामुळे झाडाच्या बुडापासून फांद्या लागतात. झाडाचे बूड, खोड व फांद्यांची बळकट वाढ होते. फुटवे अधिक असल्याने फुलधारणा चांगली होते परिणामी उत्पादनात फायदा होतो.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
240
89
संबंधित लेख