क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील पिवळेपणा समस्या आणि उपाययोजना!
सोयाबीन हे एक तेलवर्गीय पीक असून यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पिवळेपणा समस्या आढळून येत आहे. कमी किंवा अतिरिक्त पाऊस, कीड रोग आणि तणांचा प्रादुर्भाव तसेच असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन या कारणामुळे पिकात पिवळेपणा समस्या आढळून येते. यावर उपाययोजना म्हणून सोयाबीन पेरणी नंतर १५ ते २० दिवसांत पिकातील तण नियंत्रित करून पुढील विकासासाठी आणि पिवळेपणा कमी करण्यासाठी २०:२०:०:१३ हे खत @ ५० किलो आणि सल्फर ९०% @ ३ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे त्यानंतर जमिनीत ओलावा नसेल तर पिकास पाणी द्यावे. पिकामध्ये चांगल्या वाढीसाठी व अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करण्यासाठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स ग्रेड-२ @ १.५ ग्रॅम सोबत विद्राव्य १९:१९:१९ @ ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
59
35
संबंधित लेख