हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अल्प ते मध्यम पावसाची शक्यता!
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे या आठवड्यात महाराष्ट्राचे बऱ्याच भागात पावसात उघडीप र तुरळक ठिकाणी अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हवेच्या दाबत बदल हे तापमान घटकामुळे होतात. गुजरात, राजस्थान या पश्चिमेच्या बाजूस तसेच वायव्ये दिशेस हवेच्या दाबत होणाऱ्या बदलामुळे व पूर्व भागात हवेचे दाब कमी होऊन वारे उत्तर पश्चिम भारताकडून पूर्व भारताच्या बाजूस वाहत असून पुन्हा ते दिशा बदलून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे वाहत आहेत.त्यामुळे त्या भातात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी निर्माण होईल. सद्य परिस्थितीत कोकणातही पावसाचे प्रमाण मध्यमच राहील. पूर्व विदर्भ, मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हवामान ढगाळ राहील. मात्र पावसाचे प्रमाण अल्प ते माध्यम स्वरूपात राहील. पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. बऱ्याच महाराष्ट्राच्या भागात पावसात खंड पडल्याचे दिसून येईल. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग संपूर्ण राज्यात सर्वसाधारणच राहील. त्यामुळे पावसाळा जोर राहणार नाही. जेथे हवेचे दाब कमी होतील त्याच भागात पावसाचे प्रमाण वाढलेले दिसून येतील. संपूर्ण पश्चिम विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यातूनच त्याभागात ढग वाहून आणले जातील आणि पाऊस होईल. सकाळची व दुपारची सापेक्ष आद्रता कमी राहण्यामुळे पावसाचे प्रमाण हि कमी राहील. त्याभागात पाऊस होईल त्या भागात ढगांच्या गडगडासह पाऊस होईल. वरील हवामानाच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी, १) आडसाली उसाची लागवड १५ ऑगस्ट पर्यंत करावी व त्यासाठी १० ते ११ महिने वयाचे बियाणे निवडावे. २) मका लागवडीसाठी लवकर तयार होणाऱ्या वाणांची निवड करून लागवड करावी. ३) भात रोपांचे लावणीचे काम पूर्ण करावे. ४) फळबाग लागवडीसाठी तयार केलेल्या खड्ड्यात रोपे सरळ लावावीत.
संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ).., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
6
इतर लेख