क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील मावा, हिरवे तुडतुडे आणि पांढरी माशी नियंत्रण!
कापूस पिकात मोठ्या प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींनी पानांमधील रसशोषण केल्यामुळे झाडाची पाने वाकडी होऊन पिवळे आणि लालसर होतात व कालांतराने गळून जातात. यावर उपाययोजना किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास निमतेल @ ३ ते ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच किडींचा प्रादुर्भाव प्रमाण जास्त असेल तर डिनोटेफ्युरॉन २० % असलेले टोकन @ ६० ग्रॅम सोबतच पिकात फुलपाते चांगले लागण्यासाठी अमिनो आम्ल घटक असलेले बहार ३०० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
184
81
संबंधित लेख