व्हिडिओवायटी जीके स्टोर
जाणून घेऊ, जैविक कीड नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक!
शेतकरी बंधूंनो, पिकातील हानिकारक व मित्रकीटक यांच्यातील गफलत टाळण्यासाठी त्यांची आपल्याला ओळख असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही मित्रकीटकांची माहिती पाहूया. परोपजीवी कीटक :- हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे. ब) परभक्षी कीटक :- हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो. 1) ट्रायकोग्रामा 2) चिलोनस 3) एनकार्शिया 4) अपेंटॅलीस (कोटेशिया) 5) ब्रेकॉन.. या मित्र कीटकांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- वायटी जीके स्टोर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
159
43
संबंधित लेख