क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता!
प्रिय शेतकरी बंधूंनो, मान्सून देशातील मध्यवर्ती राज्यात सक्रिय आहे. १५ आणि १६ जुलैपर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रच्या काही भागात पावसाची शक्यता आहे .गोंदिया जिल्ह्यात २५५ मिली मीटर ,अकोला जिल्ह्यात २३० मिली आणि नंदुरबार जिल्ह्यात २२५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ अणि मराठवाड़ा भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई लगत पट्ट्यावर येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वार्तिविला आहे. संपूर्ण हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
125
6
संबंधित लेख