क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, आपल्या कापूस पिकातील रसशोषक किडींचे अचूक नियंत्रण!
• बर्‍याच वेळा असे होते कि, पिकामध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त किडी आढळून येतात. त्यावेळी किडींचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांच्या निवडीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात. • कोण कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे किंवा कोणत्या किडीचा अधिक प्रादुर्भाव आहे. ते लक्षात घेऊन कीटकनाशकाची निवड करावी. • किडींच्या प्रादुर्भावाची अंदाज केल्यास पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावावे. • पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी रायायनिक औषधे वापरण्या ऐवजी निमार्क/निम तेल @५० मिली प्रति १० लिटर पाण्यात किंवा लॅकनिसिलीम लॅकेनि किंवा बव्हेरिया बेसियाना या बुरशी आधारित पावडरची @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • जर, पिकामध्ये तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव असल्यास असिफेट ७५ एसपी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळवून फवारणी करावी. • जर, पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असल्यास बिफेंथ्रीन १० ईसी @१० मिली किंवा फेंप्रोपॅथ्रीन ३० ईसी @४ मिली किंवा पायरिप्रोक्सीफेन १० ईसी @ २० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी @ २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळवून फवारणी करावी. • जर पिकामध्ये फुलकिडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव असल्यास स्पिनॅटोराम ११.७ एससी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • जर पिकामध्ये मावा व तुडतुडे दोन्ही किडी पिकामध्ये आढळल्यास नियंत्रणासाठी मिथाईल-ओ-डेमेटोन २५ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • जर पिकामध्ये मावा आणि पांढरी माशी एकाच वेळी पिकामध्ये आढळल्यास नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यामधून फवारणी करावी. • तसेच, मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रसशोषक किडींचा एकाच वेळी प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी असिटामाप्रिड २० एसपी @१० ग्रॅम किंवा फिप्रोनील ४% + असिटामाप्रिड ४% एससी @१० ते २० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
92
9
संबंधित लेख