क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय!
कपाशीच्या बोडांना एकदा अळीचा प्रादुर्भाव झाल्यांनतर रासायनिक घटकांचा कितीही बेसुमार वापर केला तरी त्यातील अळी नियंत्रित करणे कठीण होऊन जाते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. यासाठी पिकात वेळीच कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे. कापूस पिकात लागवडीनंतर ३० दिवसानंतर १ ते २ टक्के झाडावर फुलपाते दिसायला लागताच कामगंध सापळे बांबू अथवा काठीच्या साहाय्याने एकरी ५ ते ७ सर्वत्र लावावे. पिकात सापळे लावताना त्याची उंची झाडाच्या उंचीपेक्षा फक्त अर्धा फूट वर असावी. तसेच सापळे लावताना त्यातील ल्युर च्या गोळी ला इतर कसला वास लागणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून ल्युर च्या वासाने नरमाशीचा पतंग सापळ्यामध्ये अडकून नियंत्रित केला जाईल. बोन्ड पक्वता पर्यंत कामगंध ल्युर ची गोळी प्रत्येक १५ ते २० दिवसांनी बदलत राहावी. सापळ्यात माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर पीक पाते आणि फुलोरा अवस्थेत असतानांच अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी एखाद्या रासायनिक घटकांची फवारणी घ्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
103
28
संबंधित लेख