AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय, वापरण्याची पद्धत व फायदे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय, वापरण्याची पद्धत व फायदे!
 पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सॉल्ट आहे.  हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.  यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.  कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.  पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो.  पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते.  पोटॅशियम शोनाईटमध्ये “ पोटॅशियम व मॅग्नेशियम” ही अन्नद्रव्ये असल्याने मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारण्यास व पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्यांचे मुळांकडून होणारे शोषण वाढण्यास मदत होते.  फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात. वापरण्याचे प्रमाण :-  जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.  ड्रीपमधून – फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.  फवारणीतून – ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात.  स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून फवारणी साठी वापरू नये.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
393
67