क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे आणि उपाययोजना
संपूर्ण महाराष्ट्रात तेलवर्गीय पीक म्हणून सोयाबीन पिकाची खरिफ हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. परंतु जैविक, अजैविक ताण आणि अपुरे पीक व्यवस्थापन माहिती अश्या विविध कारणांमुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तर आपण या लेख मध्ये सोयाबीन पिकाचे कमी उत्पादनाची कारणे आणि उपाययोजना पाहूया.  आधुनिक पेरणी पद्धत - यामध्ये पेरणी अंतर, पेरणी कालावधी, एकरी बियाणे, वाणांची निवड, बीजप्रक्रिया, पेरणी पूर्वी बियाण्याची उगवणशक्ती तपासणे आणि झाडांची संख्या योग्य प्रमाणात राखणे यांची पुरेपूर माहिती जाणून घ्यावी व त्यानुसार पेरणीचे नियोजन करावे.  तण व्यवस्थापन - पेरणी पूर्वी आणि पेरणी नंतर कुठले तणनाशक कधी, कसे आणि किती प्रमाणात वापरावे यांची पुरेपूर माहिती नसल्यामुळे वेळीच तण नियंत्रण होत नाही. तण व्यवस्थापनासाठी सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याबरोबर कोरड्या जमिनीत पेंडीमिथॅलीन या तणनाशकाचा वापर करावा. तसेच पीक उगवुन आल्यानंतर तण ४ ते ५ पाने अवस्थेच्या आत ईमाझेथापीर, ईमाझामॅक्स यांसारखे घटक असलेल्या तणनाशकांचा वापर करावा. परंतु फवारणी करताना आंतरपीक असेल तर तणनाशकांची निवड व वापर काळजीपूर्वक असावा.  अन्नद्रव्ये व्यवस्थापन - सोयाबीन हे द्विदल गटातील पीक असल्यामुळे झाडांच्या मुळांवर नत्राच्या गाठी तयार होतात त्यामुळे पिकास सुरुवातीला नत्रयुक्त खतांचा वापर केल्यावर पुन्हा अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर करणे टाळावा. याउलट सोयाबीन तेलवर्गीय पीक असल्यामुळे दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी गंधक ह्या द्य्य्यम अन्नद्रव्याचा वापर सुरुवातीलाच करावा.  पाणी व्यवस्थापन - पावसावर आधारित पेरणी केल्यामुळे पिकाला गरजेनुसार पाणी दिले जात नाही. यासाठी पेरणी जरी पावसावर आधारित केली असेल तर पीकाला फांद्या फुटताना म्हणजेच पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी, पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणी नंतर ४५ ते ५० दिवसांनी, शेंगा भरताना म्हणजेच पेरणी नंतर ६० ते ६५ दिवसांनी या महत्वाच्या अवस्थेत पाऊस नसेल तर पाण्याचे नियोजन करावे.  कीड रोग व्यवस्थापन - सोयाबीन पिकात तांबेरा, करपा, खोडमाशी, पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळीचा आणि रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाण प्रादुर्भाव होतो. यासाठी सुरुवातीपासून एकात्मिक कीड रोग पद्धतीचा अवलंब करावा.  उशिरा पीक काढणी - पिक पक्व झाले तरी वेळेवर काढणी केली नाहीतर तर शेंगा फुटून दाण्याचे नुकसान होते यासाठी शेंगा ९० ते ९५ टक्के पक्व झाल्याबरोबर पिकाची काढणी करावी.  अवकाळी पाऊस - पीक काढणीच्या वेळी अचानक पाऊस झाल्यावर पीक काढणी करणे शक्य होत नाही यामुळे शेंगानांच कोंब फूट लागतात आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन घेताना वरील सगळ्या बाबींचा विचार करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स _x000D_ _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
237
43
संबंधित लेख