क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस शेतकऱ्यांनो सावधान! ऊसावर आलाय नवीन “पोक्का बोईंग” रोग!
बुरशीजन्य पोक्का बोईंग रोग प्यूजॉरियाम मोनोलीफॉरमी या बुरशीमुळे होतो. मुख्यत हा रोग वायुजन्य मार्गाने संक्रमित होतो त्याचबरोबर दुय्यम संसर्ग ऊसाचे कांडे, सिंचनाचे पाणी, तुरळक पाऊस आणि माती याद्वारे होतो. यजमान पिकांमध्ये केळी, मका, कापूस, आंबा, ऊस आणि इतर महत्वाची पीकांवरती या बुरशीचा वावर दिसतो. रोगजनक कोणत्याही जखमाद्वारे यजमान उतीमध्ये प्रवेश करते._x000D_ _x000D_ 1) रोगाची लक्षणे-_x000D_ _x000D_ • ऊसाची लागवड जर का मार्च-एप्रिल महिन्यात केली तर या रोगाची लक्षणे आढळू शकतात._x000D_ • सुरूवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते. पानांच्या नियमित आकारामध्ये बदल होताना दिसतो._x000D_ • पानाच्या खालच्या भागात सुरूवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात अशा पानांचा आकार बदलतो, लांबी कमी होते. खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात किंवा वेणीसारखी गुंडाळली जातात._x000D_ • प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात._x000D_ _x000D_ 2) रोगाचे नियंत्रण-_x000D_ _x000D_ • रोगग्रस्थ दिसलेले रोप पहिल्यांदा रानातून उपटून जाळून किंवा पुरून टाकले पाहिजे._x000D_ • बेणे प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती लिटरच्या हिशोबाने एक ताससाठी बेण तयार द्रावणात बुडवून ठेवावे व त्यानंतर लागण करावी._x000D_ • कॉपर ऑक्सी क्लोराइड २ ग्राम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ • क्सापोनाजोल (कंटॉप) २५० मिली १५० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी. दोन-तीन फवारण्या १५ दिवसाच्या फरकाने घ्याव्यात._x000D_ • बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेड हे दोनी एकत्र ड्रीप द्वारे द्यावे, १ किलोग्रॅम बोरॉन आणि ५ किलो कॅल्शियम नायट्रेड असे सलग १० दिवसातून २ वेळा तरी सोडावे._x000D_
संदर्भ:- कृषी जागरण हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
16
संबंधित लेख