क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनाशक फवारणीवेळी योग्य नोझलचा वापर व काळजी!
• फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा. • तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक. • फवारणी वारा शांत असताना करावी. • फवारणी पंपासाठी शिफारशीनुसार नोझलचा वापर करावा. • फवारणीसाठी लागणारे पाणी ठरविण्याकरिता फवारणी पंप कॅलीबरेट करुन घ्यावा. • तणनाशके पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा, हाताचा वापर कस्त नये. • तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गढूळ किंवा गाळ मिश्रित पाणी वापरु नये. • अपेक्षित ताण नियंत्रणाकरिता शिफारस तणनाशकाची मात्रा फवारणी क्षेत्रावर पडेल याची काळजी घ्यावी. • फवारणी करीत असताना सेवन, धूम्रपान किंवा डोळे चोळणे टाळावे. • तणनाशक खरेदी करण्यापूर्वी संबधित तणनाशकाचा फवारणी करावयाच्या पिकाकरिता लेबलक्लेम आहे किंवा नाही, याची खात्री करावी. • तणनाशके फवारण्यापूर्वी फवारणी करावयाच्या क्षेत्राजवळ दुसरे करुनच योग्य ती काळजी घेऊन तणनाशकाची फवारणी करावी. तणनाशक फवारणीसाठी वापरावयाचे नोझल्स • तणनाशकाच्या प्रकारानुसार फ्लॅटफेन अथवा फ्लडजेट प्रकारातील नोझलचा वापर तणनाशक फवारणी करताना करावा. जमिनीवर तणनाशका फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेटनोझलचा वापर करावा. तणनाशक फवारणी करताना होलोकोन व सॉलिडकोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
97
3
संबंधित लेख