क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची रोपवाटिकेतील रोपे मर (डम्पिंग ऑफ) रोगाचे नियंत्रण!
मिरची रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुस-या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. ज्या रोपांना हा प्रादुर्भाव झाला आहे त्या रोपांच्या जमिनीलगत बुंध्याजवळचा भाग काळा पडलेला दिसतो. अशी रोपे सुकून जातात. याच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बियाण्यास मेटॅलॅक्झील ३१.८% ईएस या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिका उंच गादीवाफ्यावर केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीची वाढ रोखण्यास मदत होऊन रोपांची वाढ चांगली होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
5
संबंधित लेख