क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थांबद्दल जाणून घेऊया!
महाराष्ट्रामध्ये हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. तर आपण या पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांबद्दल जाणून घेऊया, हळदीची लागवड केल्यानंतर २५ ते ३० दिवसांपर्यंत उगवण होत राहते. बालपण दोन महिन्याचे असते. पहिले पान १० दिवसांनी निघते व दुसरे पान १० ते १५ दिवसांत पूर्ण होते. कंदातील अन्नघटकांवर सुरूवातीस हळदीचे रोप जगत असते. त्यानंतर जेंव्हा साल सुटते तेंव्हा हळदीच्या पीकास बाहेरून अन्नपुरवठा सुरू होतो. अशावेळी तीच्या पानांतील वाढ पटीत असणे अवश्यक आहे. म्हणून २ ते ४ पानांवरच हळदीचे बालपण संपते. कंदातून हळदीचे पिकास १० पाने तयार होईपर्यंत अन्नपुरवठा होत असतो. लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक ते दीड महिन्यांनी फुटवे येण्यास सुरूवात होते. नंतर १० ते १२ दिवसांत दुसरी फूट येते. अशा १० ते १२ फूटी आल्याच पाहिजेत. त्यामुळे जमिनीतील वाढणाऱ्या कंदामध्ये वाढ होत जाते. सुरूवातीच्या काळात झाडांची उंची ३५ ते ३७.५ सेंमी पर्यंत असते व नंतर ९० ते १२० सेंमी पर्यंत वाढत जाते. सर्वसाधारण पानांची लांबी ५५ सेंमी व रूंदी १७ सेंमी असते व देठाची लांबी ३० सेंमी व घेर ४ सेंमी असतो. लागवडीनंतर ६ ते ७ महिन्यांनी हळदीला फूलांचे कोंब येवू लागतात. ८ ते ९ महिन्यात हळदीची पाने पिवळी पडल्यानंतर पीक काढणीस तयार होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
118
27
संबंधित लेख