क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
कोकणात मुसळधार तर उर्वरित राज्यात मध्यम पावसाची शक्यता!
महाराष्ट्रातील सर्व हवामान विभागातील जिल्हावार अंदाजाचे विश्लेषण करण्याचे काम या सदरात केले जाते. हे अंदाज मध्यम पल्ल्याचे असतात. या विश्लेषणाचा व माहितीचा उपयोग शेतकरी व नागरिकांना व्हावा यासाठी महाराष्ट्रातील या संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्तींनी त्याचा उपयोग करावा आणि या माहितीचा उपयोग करून शेती पिकांचे नुकसान होऊ नये व शेतकरी बांधवांनि कीड व रोगाचा प्रादुर्भाव याची शक्यता लक्षात घेऊन पिकांचे संरक्षण करून त्यांचे उत्पादन वाढवावे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोकण:- दक्षिण व उत्तर कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात दिनांक २१ व २२ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी व त्यापुढे आठवड्यातील दिवसात ५८ ते ८७ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३२ तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्र:- उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात या आठवड्यात ८ ते १३ मि.मि पावसाची शक्यता असून दिनांक २१ व २२ जून रोजी नाशिक जिल्ह्यात प्रति दिनी ७ ते ८ मि.मी, धुळे जिल्ह्यात ११ ते १५ मि.मी, नंदुरबार जिल्ह्यात दिनांक २१ रोजी १३ मि.मी व जळगाव जिल्ह्यात ५ ते ११ मि.मी पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळ ची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२% राहील. मराठवाडा:- मराठवाड्यात या आठवड्यात ५ ते १४ मि.मी पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक २१ व २२ जून रोजी ८ व ३ मि.मी पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात ५ मि.मी, नांदेड जिल्ह्यात ६ ते १४ मि.मी, बीड जिल्ह्यात ६ मि.मी, परभणी जिल्ह्यात १० मि.मी, हिंगोली जिल्ह्यात ३ ते १० मि.मी, जालना जिल्ह्यात ७ मि.मी व औरंगाबाद जिल्ह्यात १४ ते ६४ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल व तो ७ ते २० कि.मी प्रति ताशी राहील. वाऱ्याचा वेग अधिक राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. पश्चिम विदर्भ:- पश्चिम विदर्भात दिनांक २१ व २२ रोजी पावसाची शक्यता कमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ कि.मी राहील. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. मध्य विदर्भ:- यवतमाळ जिल्ह्यात ३ ते १० मी.मी पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी राहील. पूर्व विदर्भ:- चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक २१ व २२ जून रोजी ३ ते ४ मी.मी पावसाची शक्यता असून भंडारा जिल्ह्यात ४ मी.मी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ते ३१ मी.मी व गोंदिया जिल्ह्यात १० मी.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ कि.मी राहील. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र:- कोल्हापूर जिल्ह्यात ११ ते १४ मी.मी, सांगली जिल्ह्यात ३ ते ६ मी.मी, सातारा जिल्ह्यात ४ ते ६ मी.मी, सोलापूर जिल्ह्यात ३ ते ५ मी.मी, पुणे जिल्ह्यात ४ ते १४ मी.मी व नगर जिल्ह्यात ६ मी.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १८ कि.मी राहील. वरील हवामानाच्या अंदाजानुसार आपण पिकांची लागवड व पिकांचं संरक्षण करावे.
संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
0
संबंधित लेख