क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
लॉक डाऊन मध्ये ३५ कोटींची शेतमाल तारण कर्ज वितरित!_x000D_
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे शेतमाल तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असून,याची दखल घेत केंद्र पातळीवर संपूर्ण देशात तारण योजना राबविण्यात हालचाली सुरु असल्याचे समजते. पवार म्हणाले,कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या.देशांतर्गत वाहतूकही ठप्प होती.त्यामुळे शेतमालाची खरेदी विक्री थांबली होती.या परिस्थितीत काढणी झालेला शेतमाल कुठे ठेवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना होता.शेतमालाला मागणी नाही आणि दर पण नाही,यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पणन मंडळाने प्रयत्न केले.यामुळे गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांनी मोठयाप्रमाणावर शेतमाल तारण ठेवून सुमारे ३५ कोटींचे कर्ज घेतली आहेत.बाजार समित्यांसह पुरवठा साखळी हळूहळू सुरळीत झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. खरिपाच्या तोंडावर मदत: कोरोना टाळेबंदीत पीक कर्ज वितरणदेखील विस्कळीत झाले आहे.अनेक शेतकरी विकास सोसायट्यांचे कर्ज नवे जुने करतात.हे करणेही काही शेतकऱ्यांना शक्य झाले नाही.अशा शेतकऱ्यांना तारण कर्जामुळे खरिपाच्या तोंडावर पैसे हातात आले. अशी आहे योजना: शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ %कर्ज ६ महिने कालावधीसाठी ६ %व्याज दराने दिले जाते.या योजनेमध्ये तूर ,गहू,घेवडा,मूग ,उडीद,सोयाबीन,सूर्यफूल,हरभरा,भात,करडई,ज्वारी,बाजरी,मका,काजू ,बेदाणा,सुपारी,हळद,आदी शेतमालाचा समावेश आहे.ही योजना राबविण्यासाठी ज्या बाजार समित्यांकडे स्वनिधी नसेल अशा बाजार समित्यांना ५ लाखांचा निधी पणन मंडळाकडून दिला जातो.तर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची समितीच्या मागणीनुसार पणन मंडळाकडून प्रतिपूर्ती केली जाते. ऑनलाईन तारण योजना सुरु शेतमाल तारण योजनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सहकारी बँक आणि वखार महामंडळ यांच्या वतीने प्रायोगिक तत्तवार तारण योजना राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.याबाबतचे आदेश नुकतेच सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. संदर्भ - १९ जून २०२०अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
8
0
संबंधित लेख