क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात लागवडीपूर्वीचे नियोजन!
भाताची लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करताना एक चांगली खोलवर जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिक्स करून घ्यावे आणि २ ते ३ वखारण्या करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहण्यासाठी चांगल्या प्रतीची चिखलणी करावी. यासाठी उभी आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात सामान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी. चिखलणीच्या वेळी एकरी खाचरात साधारणतः युरिया ५० किलो, १५:१५:१५ @ ५० किलो आणि १०० किलो निंबोळी पेंड द्यावे. किंवा अमोनियम सल्फेट १५ किलो आणि १५:१५:१५ @ ५० किलो द्यावे. नत्रयुक्त खतांचा जास्त ऱ्हास होऊ नये यासाठी निंबोळी पेंड मिक्स करणे आवश्यक आहे. चिखलणी करताना खते जमिनीत खोलवर व व्यवस्थित मिक्स करून घ्यावीत. वाणांच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी व लागवडीपूर्वी रोपे क्लोरोपायरीफॉस आणि बाविस्टीन च्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावी. जेणेकरून सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
66
10
संबंधित लेख