क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकाचे पूर्व नियोजन!
मका बियाणांची टोबून किंवा फोकून किंवा पेरणी करून लागवड केली जाते. एक एकर क्षेत्रासाठी ८ किलो बियाणे पुरेसे होतात. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. पेरणीवेळी ४५ से.मी दोन सरीमधील तर ३० सें.मी दोन रोपांतील अंतर ठेवून लागवड करावी. पेरणीवेळी २५ किलो युरिया, ५० किलो डी.ए.पी, १० किलो झिंक सल्फेट आणि २५ किलो पोटॅश एकत्र करून खतमात्रा द्यावी. हे बियाणे साधारणतः ५ ते ७ दिवसात उगवतात.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
97
6
संबंधित लेख