सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील वाळवी किडीचे नियंत्रण!
• वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी, पिकाच्या बांधावर वाळव्यांनी तयार केलेली वारुळ आढळून आल्यास ते नष्ट करावे.
• उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करुन जमिनीतील वाळवी नष्ट करता येते.
• पूर्वीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
• चांगले कुजलेले शेणखत वापरा तसेच गांडुळेपासून बनविलेले सेंद्रिय खत, गांडूळखत वापरणे फायदेशीर ठरते.
• पिकामध्ये निंबोळी पेंड प्रति हेक्टरी १० क्विंटल या प्रमाणात दिल्यास वाळवीचा प्रादुर्भाव कमी होतो.
• बव्हेरिया बॅसियाना १.१५ टक्के जैवनाशक (जैविक-कीटकनाशक) @२.५ किलो प्रति हेक्टरी ६०-७५ किलो शेणखतामध्ये मिसळावे त्यानंतर हलक्या पाण्याची फवारणी करावी व ८-१० दिवस सावलीत ठेवावे यानंतर पेरणीपूर्वी जमिनीत नांगरणी नंतर मिसळावर यामुळे वाळवी नियंत्रित होते.
• आर्थिक नुकसान पातळीपेक्षा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर रासायनिक पद्धतीने नियंत्रण केले जाते यासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी @ २.५ लिटर प्रति हेक्टर पाणी देताना पाण्यासोबत द्यावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_
_x000D_
हि माहिती उपयुक्त वाटल्यास व आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.