क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानअॅग्रोवन
कृषि योजना 'सातबारा मुक्त' होणार! _x000D_
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेताना सातबारा उतारा प्रत्यक्ष आणून देण्याची सक्ती हटवली जाणार आहे.कृषी खाते स्वतःच महसूल विभागाच्या प्रणालीतून सातबारा उपलब्ध करून घेईल.तशी यंत्रणा विकसित केली जात आहे. राज्यात कृषी व जलसंधारणा सचिव एकनाथ डवले यांनी या प्रयोगाला हिरवा कंदील दिला आहे.पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा गेल्या रब्बी हंगामात देण्याची गरज भासली नाही. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याने सर्व योजनांबाबत महसूल विभागाच्या सातबारा उताराचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. श्री डवले म्हणाले "ठिबक फळबागा,अवजारे तसेच योजनांसाठी कृषी खात्याकडे अर्ज करताना शेतकरी सातबारा उतारा जमा करतात.तो या पुढेही वापरला जाईल.मात्र,त्यासाठी शेतकऱ्यांना त्रास न होता थेट महसूल विभागाच्या प्रणालीतून ऑनलाइन सातबारा जमा केला जाणार आहे.सर्व योजनांमध्ये तशी सुधारणा केली जात आहे .या वर्षीच हे काम पूर्ण होईल".दरम्यान, खरिपात पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मदत व मार्गदर्शनासाठी कृषी विभाग सज्ज झाले आहेत. "गेल्या हंगामात पावसाळा लांबला होता.त्यामुळे यंदा किडींची प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता एरवीच्या स्थितीपेक्षा जास्त आहे.कारण, विविध किडींच्या प्रजननाच्या साखळीला तोडणारा कालावधी यंदा उपलब्ध झालेला नाही.त्यामुळे जमिनीत कोष तसेच राहिलेले आहे.यासाठीच आम्ही पीक संरक्षणावर जास्त लक्ष देणार आहोत," असे सचिवांनी स्पष्ट केले. संदर्भ - अ‍ॅग्रोवन १५ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
213
2
संबंधित लेख