क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेतील नागअळीचे नियंत्रण!
जमिनीतील वाफसा अवस्थेनुसार कापूस बियाणांची उगवण साधारणतः ५-७ दिवसांत होते. उगवण झाल्यानंतर पिकात उष्ण व दमट वातावरणामुळे नागअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो, हि अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील अळी पिकावर सर्वाधिक परिणाम करते. हि अळी पानांमध्ये प्रवेश करून आतील हरितद्रव्ये खायला सुरूवात करते त्यामुळे पानांवर पांढरे नागमोडी आकाराचे पारदर्शक पट्टे दिसतात. कालांतराने हि पाने पिवळी पडून गळून जातात. याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी आपण १०,००० पीपीएम निमार्क @६०० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच ४ दिवसांनी पिकाची वाढ व काळोखीसाठी फुलविक अ‍ॅसिड @१५ ग्रॅम मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
150
2
संबंधित लेख