क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकासाठी पाणी व्यवस्थापन!
केळी पिक हे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या पिकाच्या एकूण सर्वच अवस्थांमध्ये पाणी महत्वाचे असते. योग्य वेळी, प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीचा प्रकार, तापमान, पिकाची अवस्था, वाऱ्याचा वेग या सर्व घटकांचा विचार करून पाणीमात्रा व वेळ ठरवावी. अलीकडे एकूण केळीखालील क्षेत्रापैकी जवळपास सर्व केळी पिकास ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. वाफा पद्धतीच्या बागांना उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धतीत संचाची नियंत्रित देखभाल व दुरुस्ती महत्वाची ठरते. लागवडीपासून ३ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड साधारणतः ५ लिटर तर ४ ते ६ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड १५ ते २० लिटर व त्या पुढील वयाच्या बागांना २५ ते ३० लिटर पाणी प्रती दिन प्रती झाड द्यावे. हलक्या जमिनीत पाणी सरळ मुरते व ओलीतक्षेत्र टक्केवारी कमी असते. अश्या परिस्थितीत कमी पाण्यामुळे विकृती निर्माण होऊन वाईट परिणाम संभवतात. अशा वेळी जेथे पाणी पडते तेथे १ ते २ किलो शेणखत / गांडूळखत पसरावे. शिफारसीच्या मात्रेत पाणीपुरवठा केल्यास हवामानाच्या विपरीत घटकांच्या वाईट परिणामांची तीव्रता कमी होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
51
9
संबंधित लेख