क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकातील लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना
लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मका पिकाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत अळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे मका पिकाची फेरपालट करावी तसेच जमिनीची खोलगट नांगरणी करून जमिन उन्हात तापून देऊन जमिनीतील आधीच्या पिकाचे सगळे अवशेष नष्ट करावे आणि लागवडीच्या वेळी कार्बोफ्युरॉन कीटकनाशक १३ किलो प्रति एकर जमिनीतून खतांसोबत मिक्स करून द्यावे जेणेकरून जमिनीतील किडीची सुप्तावस्था नियंत्रित करण्यास मदत होईल. तसेच मका पिकाची उगवण झाल्याबरोबर पिकात कामगंध सापळे एकरी ५ ते १० लावावे. जेणेकरून नर पतंग नियंत्रित होईल तसेच किडीचा प्रादुर्भाव प्रमाण किती आहे हे लक्षात घेऊन पिकात स्पिनॅटोराम घटक असलेले कीटकनाशक १८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
84
3
संबंधित लेख