क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकामधील फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे लक्षणे आणि नियंत्रण!
या किडीचा प्रादुर्भाव रोप लावल्यानंतर काही आठवड्यानंतर दिसून येतो. अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात शिरून आतिल भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वळतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी केली पोखरून आत शिरते, प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळुन, सुकून जमिनीवर गळून पडतात. फळे आल्यानंतर हि अळी सुरवातीला छिद्र करून फळांत प्रवेश करून विष्टेद्वारे प्रदेश बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही. यामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. याच्या नियंत्रणासाठी प्रत्येक तोडणीच्या वेळी खराब झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लूजी @४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला कीटकनाशक बदलून वापरावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
63
9
संबंधित लेख