क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटए बी पी माझा
निसर्ग चक्रीवादळाचं रौद्र रुप! मुंबईतील संकट टळले!
निसर्ग चक्रीवादळाचं रौद्र रुप! मुंबईतील संकट टळले! निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईतील धोका टळला आहे. दोन -तीन तासांनंतर वॉल क्लाऊड नाशिक, धुळ्याकडे हळूहळू सरकणार आहे. पोस्ट लॅण्डफॉलचा परिणाम म्हणून मुंबईत जोरदार वारा आणि पाऊस दिसत आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाहीय. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे समुद्र सेतूवरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालक माघारी फिरत असून पुढील सूचना येईपर्यंत सी-लिंक बंद असल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली. निसर्ग वादळामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर लावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटी सुटण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा बोटी बांधाव्या लागत आहेत. तसेच कच्च्या घरातील लोकांना पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय साधून इतरत्र स्थलांतरित करत आहेत. सध्या मुंबईत वा-याचा वेग ५५ किमी प्रती तास नोंदवला गेलाय...पुढील काही तासात वा-याचा वेग वाढेल - असे हवामान विभागाने वार्तिविली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल तसेच प्रभाग अधिकाऱ्यांशी बोलून ते वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल हे पाहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावं आणि सावधानता बाळगावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला देखील हायअलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचलेले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. संदर्भ - ए बी पी माझा ३ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
212
0
संबंधित लेख