क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकाच्या लागवडी विषयक महत्वाची माहिती!
• अन्नधान्ये पिकांमध्ये भात हे एक प्रमुख तृणधान्ये पीक असून खरिफ हंगामात सगळ्यात जास्त लागवड केली जाते. त्यामुळे भातासाठी योग्य पाणी, अन्नद्रव्ये तसेच कीड, रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • यासाठी सुरुवातीला वाणांच्या कालावधी आणि बाजारभाव यानुसार दर्जेदार वाणांची निवड करून रोपवाटिका तयार करावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रोपवाटिका १५ मे ते १५ जून पर्यंत करावी. संकरित जातीसाठी एकरी ७ ते ८ किलो बियाणे वापरावे. एक एकर क्षेत्रासाठी किमान ४ गुंठ्यांवर रोपवाटिका तयार करावी. • भाताची लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करताना एक चांगली खोलवर जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिक्स करून घ्यावे आणि २ ते ३ वखारण्या करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. • जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहण्यासाठी चांगल्या प्रतीची चिखलणी करावी. यासाठी उभी आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात सामान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी. • चिखलणी पावर टिलर अथवा पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. चिखलणी मुळे शेतात पाणी साचून राहते आणि तनांचा नाश होतो. तसेच दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते, जमिनीत अमोनिया साचून राहतो आणि स्फुरद, लोह आणि मॅंगेनिझ ची उपलब्धता वाढते आणि नायट्रेट चे प्रमाण कमी होते. • चिखलणीच्या वेळी एकरी खाचरात साधारणतः युरिया ५० किलो, १५:१५:१५ @ ५० किलो आणि १०० किलो निंबोळी पेंड द्यावे. किंवा अमोनियम सल्फेट १५ किलो आणि १५:१५:१५ @ ५० किलो द्यावे. • नत्रयुक्त खतांचा जास्त ऱ्हास होऊ नये यासाठी निंबोळी पेंड मिक्स करणे आवश्यक आहे. चिखलणी करताना खते जमिनीत खोलवर व व्यवस्थित मिक्स करून घ्यावीत. • वाणांच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी व लागवडीपूर्वी रोपे क्लोरोपायरीफॉस आणि बाविस्टीन च्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावी. जेणेकरून सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण होईल. • त्यानंतर लागवडीसाठी वाणांच्या पक्वता कालावधीनुसार लागवडीचे अंतर ठरवावे. नियंत्रित पुर्नलागवड करण्यासाठी सुधारित दोरीने आलटून पालटून खुणा करून योग्य अंतरावर लागवड करावी. ९० ते ११० दिवसांच्या वाणांसाठी १५ * १५ सेमी, १२० ते १३५ दिवसांच्या वाणांसाठी २० * १५ सेमी, आणि १४० ते १५० दिवसांच्या वाणांसाठी २० * १५ सेमी अंतरावर लागवड करावी. • संकरित जातींसाठी एका चुडात फक्त १ ते २ च रोपे लावावी. रोपे सरळ व उथळ म्हणजेच २ ते ४ सेमी खोलवर लावावीत. • लागवडीनंतर देखील तण व्यवस्थापन करून संतुलित खतांचे व पाण्याचे नियोजन करावे तसेच करपा, पानांवरील ठिपके, हिरवे तुडतुडे, खोडकीड, लष्करी अळी यांसारखे कीड व रोग वेळेवर नियंत्रित ठेवावे. जेणेकरून पिकाची गुवणवत्तापूर्ण उत्पादन भेटण्याची क्षमता वाढेल.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
84
3
संबंधित लेख