क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन बीजप्रक्रिया व लागवड माहिती!
उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास बाविस्टीन @३-५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा @५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन लागवडीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ न चुकता बघा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
182
3
संबंधित लेख